हडपसर : नॅशनल वेलफेअर असोसिएशन पुणे आयोजित डी. फार्म मेगा जॉब फेअर 2024 मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ चे कॉलेज ऑफ फार्मसीच्या 07 विद्यार्थ्यांनी या मेगा जॉब फेअर मध्ये प्लेसमेंट मिळवत यश संपादित केले.
महाविद्यालयच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि सध्या द्वितीय वर्ष डी. फार्मसी मध्ये शिक्षण घेत असलेले सहा विद्यार्थ्यांनी या मेगा जॉब फेअर मध्ये उपस्थिती लावली.
या मध्ये शुभम मारवाडकर, रितेश शिरसाठ, सौरभ शिरसाठ, सोमनाथ पंडिलवाड या चार विद्यार्थ्यांना ऑप्टिव्हल हेल्थ सोल्युशन मेडप्लस या कंपनीने ऑफर लेटर देत यांची निवड केली. महाविद्यालयच्या तीन माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये विशाखा नांगरे, स्वप्नील धवले आणी योगिता सावंत यानी जेनीवीस हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला आणि त्यांची सेकंड राऊंड साठी सिलेक्शन करण्यात आले.
आपल्या पाल्याने कंपनीमध्ये ऑफर लेटर मिळवत आपले स्थान निश्चित केल्याने पालकांनी मनापासून आनंद व्यक्त केला. या निवडी मागे, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक कंपनीची भेट, यामध्ये चालणाऱ्या कामांचा आढावा, पर्सनालिटी डेव्हलपमेंट, स्ट्रेस मॅनेजमेन्ट, मुलाखतीचे नियम आणि मुलाखत कशी द्यावी अशा विषयांवर चर्चासत्रे, व्याख्याने, कार्यशाळा आदींचे आयोजन ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग वेळोवेळी करत आहे असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी शेवाळे आणी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. योगेश काकरंबे यांनी सांगितले.
डॉ. अश्विनी शेवाळे यांनी यापुढे ही आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी अशाच प्रकारे प्रगती करत राहतील असे आश्वासन दिले. यापुढे ही आपले महाविद्यालय प्रत्येक विद्यार्थ्यांला अपेक्षित यश संपादन करण्यासाठी सदैव पाठीशी असेल, अशी ग्वाही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना प्राचार्या यांनी दिली.