आपण सुदृढ राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, काहीना काही प्रयत्न केले जातात. पण पोटाच्या वाढलेल्या चरबीने शरीरयष्टीत कमालीचा फरक जाणवतो. वाढलेले पोट तुमचे दिसणेच खराब करते. परंतु, व्यायाम किंवा योगासने वाढलेले पोट कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. जर तुमच्याकडे नियमित व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल, तर दररोज फक्त योगाभ्यास करून पोटाची चरबी कमी करता येते. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.
बिघडलेली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे पोटाची चरबी बाहेर पडू लागते. वजन वाढू लागते. चांगल्या आहाराने तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता. योगाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यापैकी एक म्हणजे पोटावरील चरबी कमी करणे. हलासनामुळे चेहऱ्यावर चमक येते. हे रक्त परिसंचरण वाढवते आणि ऑक्सिजन प्रवाह सुधारते. चेहरा चमकतो आणि रंग सुधारतो.
तसेच पिंपल्स आणि सुरकुत्याची समस्या दूर होते. हलासनामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि तणाव, मासिक पाळी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन या समस्या दूर होतात. हलासनाचे फायदे या आसनामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हा योग पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.