अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्यातील उडगी येथे २५ मे रोजी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दोन लाख रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून आठ जणांनी मिळून पती-पत्नी व दोन मुलांना घरी जाऊन शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. संशयित आरोपी नागण्णा सायबण्णा म्हेत्रे, ईरण्णा मल्लिनाथ म्हेत्रे, सायबण्णा मल्लिनाथ म्हेत्रे, लक्ष्मीबाई नागण्णा म्हेत्रे (सर्व रा. उडगी) व धरेप्पा बाबुराव हिरतोट, शिवानंद श्रीमंत सवळी, महानंदा बाबुराव हिरतोट, सिद्धाबाई श्रीमंत सवळी (सर्व रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) यांच्यावर अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद रामचंद्र सायबण्णा म्हेत्रे (वय ५२) यांनी दिली.
२५ मे रोजी नागण्णा म्हेत्रे, ईरण्णा म्हेत्रे, सायबण्णा म्हेत्रे, लक्ष्मीबाई म्हेत्रे, धरेप्पा हिरतोट, शिवानंद सवळी, महानंदा हिरतोट, सिध्दाबाई सवळी यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरात प्रवेश करून फिर्यादी व कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ, दमदाटी करत जबर मारहाण केली.