पिंपरी चिंचवड : देहुरोड परिसरामध्ये एका कौंटुंबिक कारणावरुन पती-पत्नीत भांडण झाले. भांडणानंतर पतीने पत्नीवर कोयत्नाने हल्ला करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. देहुरोड येथील शितळा नगरमध्ये शुक्रवारी (ता.24) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
गिलानी समाझी कुरेशी (वय- 46, रा. शितळानगर, देहुरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याच्या 46 वर्षीय पत्नीने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिचा पती गिलानी यांच्यात कौंटुबिक कारणावरुन वाद झाला. यामुळे चिडलेल्या पती गिलानी याने पत्नीला शिवीगाळ केली. तुला आता मारुन टाकतो, असे म्हणत तिच्यावर कोयत्याने डोक्यावर, हातावर वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेसंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.