पुणे प्राईम न्यूज डेस्क: चॉकलेट खाणे हे सर्वांनाच आवडतं. पण काही चॉकलेट हे आपल्यासाठी हानीकारक मानले जाते. त्यात डार्क चॉकलेट तर खूपचे गुणकारी आहे. हे डार्क चॉकलेट त्वचेसाठी उत्तम तर आहेच. शिवाय, मधुमेहावरही फायदेशीर आहे. या डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे हृदयविकारासंबंधी धोका कमी होऊ शकतो.
डार्क चॉकलेटमध्ये अनेक घटक आहेत ते आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. फ्लॅव्हनॉल लायकोपीनमध्ये समृद्ध असल्याने डार्क चॉकलेट एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते. डार्क चॉकलेटमध्ये असलेले संयुगे एलडीएलपासून संरक्षण देतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. डार्क चॉकलेटमध्ये असलेले बायोएक्टिव्ह संयुगे तुमच्या त्वचेसाठी गुणकारी मानले जातात.
डार्क चॉकलेट तणाव कमी करण्यासाठी प्रभावी असे माध्यम आहे. हे खाल्ल्याने तुमचा मूड सुधारतो. डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे घटक तणाव निर्माण करणारे कॉर्टिसॉल हार्मोन नियंत्रित करतात. त्यामुळे डार्क चॉकलेट खाल्ल्यास आपल्याला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो.