नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Apple ने नवीन iPad line up लाँच केला आहे. कंपनीने iPad Air आणि iPad Pro चे लेटेस्ट मॉडेल्स मार्केटमध्ये आणले आहेत. दोन स्क्रीन साईजमध्ये iPad Air लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे डिवाईस 11-इंच स्क्रीनसह 13-इंच स्क्रीन साईजमध्ये उपलब्ध असेल.
iPad Air आणि iPad Pro चे लेटेस्ट मॉडेल्स निळ्या, जांभळ्या, स्टारलाइट आणि स्पेस ग्रे रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या लेटेस्ट iPad Air मध्ये, तुम्हाला सिंगल रियर कॅमेरा, USB Type-C चार्जिंग आणि फ्रंट कॅमेरा मिळतो. त्यात तुम्ही 1 TB पर्यंत स्टोरेजही करू शकता. यामध्ये M4 चिपसेट वापरण्यात आला आहे. हे डिवाईस A11 Bionic पेक्षा 60 पट वेगवान असणार आहे.
कंपनीने 12 MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स दिली आहे. याच्या मागील बाजूस 12 MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 10 MP चा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. यामध्ये LiDAR स्कॅनर देखील देण्यात आला आहे. यात टच आयडी, 5G, मॅजिक की-बोर्ड सपोर्ट, लँडस्केप स्टिरिओ ऑडिओ यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.