नवी दिल्ली : जपानची इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवणारी कंपनी Toshiba ने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून तब्बल चार हजार कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे.
तोशिबा आपल्या ऊर्जा, पायाभूत सुविधा, उपकरणे आणि आयटी व्यवसायांचे नेतृत्व करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून कर्मचारी कपातीचा निर्णय घेत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘टोकियो स्टॉक एक्स्चेंज’मधून डीलिस्टिंग झाल्यापासून आर्थिक स्थिती स्थिर करण्याच्या दबावाला कंपनीला सामोरे जावे लागत आहे.
जपान इंडस्ट्रियल पार्टनर्सच्या (जेआयपी) नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने आपले सर्व शेअर्स विकत घेतले आणि त्यानंतर ते डीलिस्ट करण्यात आले. 2.4 लाख कोटी येन (1.30 लाख कोटी रुपये) च्या या खरेदीसाठी जेआयपीने बँकेकडून 1.4 लाख कोटी येन (76 हजार कोटी रुपये) कर्ज घेतले होते आणि त्यासाठी तोशिबाची मालमत्ता गहाण ठेवण्यात आली होती. याचाच फटका कंपनीला बसत असून, कर्मचारी कपात करण्याचा निर्णय आता घेतला जात आहे.