राजकोट : गुजरातमधील एका हिंदू भाविकाला देवाचा राग आला. रागाच्या भरात त्याने दोन मंदिरे पेटवली. जाळपोळीनंतर एका मंदिरातील मूर्तीचेही नुकसान झाले. आरोपींनी एका मंदिराला टायरच्या सहाय्याने तर दुसरे लाकडाच्या सहाय्याने आग लावली. एवढेच नाही तर तिसरे मंदिरही जाळण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.
राजकोट जिल्ह्यातील मंदिरात काही समाजकंटकांनी ही घटना घडवून आणली असावी, असे परिसरातील लोकांना वाटत होते. मात्र, खरे कारण बाहेर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. आरोपी अरविंद सरवैय्या हा पूर्वी याच गावचा प्रमुख होता. त्याने गावातील रामदेव पीर मंदिर आणि मेलडी माता मंदिराला आग लावली. खरंतर अरविंद देवावर खूप रागावला होता. पूजा करूनही त्याची इच्छा पूर्ण होत नव्हती. हवे ते न मिळाल्याने तो हताश झाला. रागाच्या भरात त्याने मंदिरांना आग लावली. पोलिसांनी आरोपी अरविंदला अटक केली आहे.
दरम्यान, आग लावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अरविंदने रामदेव पीर मंदिराला टायरच्या साहाय्याने आग लावल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे पुतळ्याचेही नुकसान झाले आहे. मेलडी माता मंदिर लाकडाने पेटवून देण्यात आले.