Weather Update : गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई शहरात मोठे वादळ येवून गेले. त्यावेळी ब-याच गोष्टी घडून गेल्या. अशातच आता पुन्हा एकदा वादळ येणार आहे. ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार आहेत, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुढील तीन ते चार तासामध्ये नाशिक, जळगाव, अहमदनगर, नुंदरबार, धुळे, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये 30-40 किमी प्रतितास प्रचंड वेगाने हे वादळी वारे वाहणार आहेत. या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. घराबाहेर जाताना खबरदारी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबईमध्ये 13 मे रोजी वादळ आले होते. या वादळामुळे मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 67 लोक जखमी झाले आहेत. तर, दुसरीकडे वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळले. यामध्ये 12 ते 13 कारचे नुकसान झाले. वादळामुळे मुंबईत या दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहे.
पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होत आहे. यंदा प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी झाला आहे. दरवर्षी 21 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानमध्ये हजेरी लावतो. त्यानंतर केरळमध्ये दाखल होतो.
गेल्या वर्षी राज्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नव्हता. यंदा मात्र दोन दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे.