बारामती, (पुणे) : दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने दोघांना हाताने व दगडाने बेदम मारहाण करून मोबाईल फोन व एक चांदीचे कडे पळवून नेल्याची घटना घडली आहे. बारामती शहरातील शिवाजी चौकातुन प्रशासकीय बाजुकडे रोडने अनुचंद हॉस्पीटलसमोर जाताना बुधवारी (ता. ०८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल उर्फ छोट्या यल्लाप्पा पवार, अभिषेक दिलीप पवार, महेश शंकर धोत्रे (रा. सर्व आमराई बारामती ता. बारामती व त्यांचे इतर चार अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओकार यशवंत जाधव (वय 21, धंदा डेकोरेशन रा. गोकुळनगर ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ०८) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास शहरातील बारामती चौकातून प्रशासकीय भवन बाजुकडे रोडने अनुचंद हॉस्पीटल समोरून ओंकार जाधव व त्यांचा साथीदार निघाले होते. यावेळी समोरून विठ्ठल उर्फ छोटया पवार, अभिषेक पवार, महेश धोत्रे हे गाडीवारून जात असताना कट मारला.
यावेळी जाधव यांनी कट का मारला असे का विचारलं, या कारणावरून त्यानी गाडी आडवी लावून तिघांनी व त्याचे इतर चार अनोळखी साथीदारांनी बेकायदा गर्दी जमवून ओकार जाधव व मित्र अनिकेत कांबळे याला हाताने व दगडाने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून मोबाईल व त्याची ४ हजार रुपये किमतीची चांदीची वस्तू रुपये काढून घेऊन पसार झाले.
दरम्यान, याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार खाडे करित आहेत.