पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यात तब्बल ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात पाच हजार रोजगाराऱ्या संधी निर्माण होतील, हा प्रकल्प पुढील ३२ महिन्यात कार्यान्वित होणार आहे. अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिली आहे.
✔️GoI has accorded approval to MIDC & Union Minister announced this approval to Maharashtra at New Delhi just few mins ago.
✔️This EMC will be ready in 32 months.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 31, 2022
उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की , देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असणार आहे. रांजणगावमध्ये होणाऱ्या या नव्या प्रकल्पामुळे राज्यातील ५ हजार युवकांना नोकरीची संधी निर्माण करेल. या प्रकल्पाचे लक्ष्य २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे असेल.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे होणारा इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प तब्बल २९७.११ एकरमध्ये पसरले जाईल आणि याच्या विकासासाठी ४९२ .८५ कोटी रुपये खर्च केले जातील. यामधील २०७ .९८ कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. असेही फडणवीस यांनी सागितले आहे.