ओतुर : खामुंडी येथील शेतकरी दिपक ज्ञानेश्वर कोकाटे यांनी जनावरांचा चारा बैल गाडीत घेऊन परतताना अचानक बैलाने (Bull) कशाला तरी घाबरून मुसंडी मारली. यांचा बैल गाडीला जुंपलेला होता. बैल गाडीसह कठडा नसलेल्या विहितून पडला आहे. बैलाने मुसंडी मारल्याने बैल हा बैल गाडीसह जवळच असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू (Death) झाला. प्रणव ने प्रसंगावधान दाखवून बैलगाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे.
सदर घटना कळताच सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांनी आळेफाटा येथील महालक्ष्मी क्रेनचे मालक किरण पुरी यांना संपर्क करून क्रेन बोलावले रात्री उशीरा दिपक कोकाटे व बाबू कोकाटे यांनी क्रेनच्या सहाय्याने खाली विहिरीत ५० ते ६० फुट उतरून खामुंडी गावातील तरुणांच्या मदतीने अथक प्रयत्न करून बैलाचा मृतदेह आणून बैलगाडी रात्री १.३० च्या सुमारास विहिरीच्या बाहेर काढण्यात यश मिळवले.
सदर शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिडित शेतक-याला आर्थिक भरपाई किंवा बैल शासना कडून किंवा सामाजिक संघटना कडून मिळावा अशी मागणी, परिसरातील शेतकरी करत आहेत. सदर घटने बाबत शेतकरी वर्गातून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.