लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव-पेठ (ता. हवेली) हद्दीत मार्ग वस्तीजवळ खुन झालेल्या सुभाष चौधरी उर्फ बाबूतात्या (वय-५४) यांच्या खुनाचे गूढ अवघ्या २४ तासात उलघडण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. दारू पिण्याच्या वादातूनच बाबूतात्या यांचा खून करणाऱ्या चुलतभावाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक आहे.
सुभाष भगवंत चौधरी (वय ५५, रा. वडाची वाडी, नायगाव, ता. हवेली) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. संपत तुकाराम चौधरी (वय ४६, रा. वडाची वाडी पेठगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष यांचा मुलगा सौरभ सुभाष चौधरी (वय २३, रा. वडाची वाडी, नायगाव) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव-पेठ (ता. हवेली) हद्दीत मार्ग वस्ती जवळसुभाष चौधरी उर्फ बाबूतात्या मृतदेह आज शनिवारी (ता.२९) आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बाबूतात्या यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त पोलिसांनी केला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचे कारण व संशयित आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
सदर खुनाचा तपास करीत असताना पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, सुभाष चौधरी आणि आरोपी संपत चौधरी हे चुलत भाऊ आहेत. ते म्हसोबा मंदिरासमोरील मार्ग वस्ती येथे शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी दारु पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरुन वाद सुरु झाला. हा वाद इतका पेटला की, संपत याने सुभाष याच्या चेहर्यावर धारधार शस्त्राने वार केला. त्यात सुभाष हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला.
दरम्यान, याप्रकरणी सुभाष यांचा मुलगा सौरभ चौधरी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी संपत चौधरी याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.