पुणे : महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या यांसारखे अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. आपल्या परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृतीनुसार, अनेक ऐतिहासिक वारसा देखील आहे. महाराष्ट्रातही अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामध्ये कार्ला-भाजा, अजंठा, वेरूळ, एलिफंटा यांसारख्या लेणी आहेत. पण एलिफंटा आणि वेरूळ या लेण्यांविषयी माहिती आपण घेणार आहोत.
वेरूळ लेणी पाहण्यासाठी देशभरातील पर्यटक दरवर्षी भारतामध्ये येतात. वेरूळ लेणी ही पहिल्या पाच स्थळांमध्ये येते. एकसंध खडकातून कोरण्यात आलेल्या लेणीला खूप महत्व आहे. ही लेणी पाहताना कोणत्या तरी गूढ दुनियेत हरवल्यासारखे वाटते. 1983 मध्ये या लेणीला ऐतिहासिक वारसा लाभला. वेरूळ लेणीमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मातील लेण्यांचा अनोखा संगम असल्याने इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. हा एक ऐतिहासिक वारसा आहे.
एलिफंटा लेणी देखील एक आकर्षक पर्यटनस्थळ आहे. एलिफंटा लेण्यांमधील प्राचीन गुहा या पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. मध्ययुगीन रॉक-कट कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा हा एक सुंदर नमुना आहे. यामध्ये एकूण 7 गुहा आहेत. यातील प्रत्येक गुहेचे विशेष महत्व असल्याने अनेक लोक इथे येतात. 60 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेल्या या लेण्या पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात. व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स या इमारतीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. 2018 मध्ये युनेस्कोने या प्रसिद्ध इमारतीला ऐतिहासिक वारसा म्हणून जाहीर केले.