प्रासंगिक – अॅड.बापूराव बंडू भागवत
जपत किनारा शीड सोडणे ना मंजूर
अन वाऱ्याची वाट पाहणे ना मंजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डोलणे नामंजूर
हे खरं करून दाखवले ते दौंड तालुक्याचे आरोग्य दूत कार्यक्षम आमदार अॅड,राहुल दादा कुल यांनी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांची ओळख आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकमेव भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून निवडून आलेले राहुल दादा कुल यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत असताना आमदार अॅड. राहुल दादा कुल यांनी सुखदुःख वाटून घेऊन मदतीचा हात देणारा एक वेगळा प्रतिनिधी म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे. दादा स्वतः डॉक्टर नाहीत परंतु हजारो रुग्णांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं आणि त्यांना आधार देण्याचे काम आदरणीय दादांनी केल आहे.
विविध शस्त्रक्रिया, किडनी प्रत्यारोपण, विविध अपघातातील रुग्ण, इतकेच नव्हे तर कॅन्सर सोबत लढत असणाऱ्या कित्येक रुग्णांना मदतीचा हात देणारे दादा दौंड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आरोग्य दूत म्हणून ओळखले जातात ते त्यांच्या कामामुळे. शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आणि ग्रामीण भागात लहानाचं मोठे झाल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाणीव आहे.
तेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून आमदार अॅड. राहुल दादा कुल यांनी मुळशी धरणाचे पाणी बारामती इंदापूर पुरंदर आणि दौंडला मिळाले पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्याचा विकास होईल याची जाणीव दादांना असल्यामुळे या प्रश्नावर रस्त्यावर विधानभवनात वारंवार संघर्ष करत असताना या विषयाचा दादांनी पाठपुरावा केला आहे.
मुळशी धरणाचे पाणी या तालुक्यांना मिळाल्यास हे सर्व तालुके पूर्णपणे बागायती होणार आहेत यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पन्नास वर्षांचा नियोजन डोळ्यासमोर ठेवून हा अवलिया काम करत आहे. गोड बोलण्यापेक्षा रोखठोक बोलणारा, निष्फळ बडबड करण्यापेक्षा वास्तवात काम करणारा, एक व्हिजन असणारा, प्रशासनाची जाण असणारा हा नेता दौंड तालुक्याचे प्रतिनिधित्व करतोय यासारखी अभिमानाची गोष्ट नाही.
खरंतर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यामध्ये दादांनी वीज पाणी आरोग्य शिक्षण या माध्यमातून अनेक कामे केली यवत सारख्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर, दौंड सरकारी रुग्णालयामध्ये प्रगतीपथावर असणारी भव्य इमारत, क्रीडा संकुल ,जलतरण तलाव, वन विभागामध्ये विकसित करण्यात आलेली उद्याने, बेबी कॅनॉल, याचबरोबर राज्य राखीव पोलीस गटातील जवानांच्या निवासाकरता तसेच सुविधान करता कोट्यावधी रुपयांचा निधी तालुक्यात आणण्याचे काम आदरणीय दादांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेला आहे.
स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आणि कार्यशाळेच्या जोरावर राज्याच्या राजकारणामध्ये स्वतःच्या कार्यकर्तुत्वाचा वेगळा ठसा उमटवण्यात दादा यशस्वी झाले आहेत. दर रविवारी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण दिवस जनता दरबारासाठी देणारा आणि सर्वसामान्य माणसांसाठी सहजासहजी उपलब्ध असणारा हा नेता खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी आहे याची जनमानसात ओळख आहे.
अष्टविनायक महामार्ग, गोरगरीब लोकांना हक्काचं घर मिळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, दौंड मध्ये वरिष्ठ न्यायालय मंजूर व्हावे, स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरू व्हावे, यासाठी दादांनी फक्त प्रयत्नच केले नाहीत तर त्याचा पाठपुरावा करून हे विषय मंजूर देखील करून घेतले हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाचं फलित होय.
या सर्व कामांवर प्रकाश टाकल्यास पुणे जिल्ह्याच्या राजकारणात झंजावात निर्माण करणारे आदरणीय दादांचे नेतृत्व आहे हे सहज लक्षात येतं त्यामुळे भविष्यातील राज्याच्या राजकारणातील दादांची वाटचाल अभिमानास्पद राहील याची खात्री आहे. दादांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो. धन्यवाद…!
शब्दांकन – दिनेश सोनवणे, (दौंड, जि.पुणे)