पुणे : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी, पोलीस हवालदार, पोलिस अंमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय तांबे, पोलीस अंमलदार मंगेश संपत भगत यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाला असून यांना पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.
हे सन्मान चिन्ह त्यांना 1 मे महाराष्ट्रदिनी प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
भोर तालुक्यातील तांभाड गावचे सुपुत्र पुणे जिल्हा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना पोलीस दलात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. अविनाश शिळीमकर सध्या पुणे जिल्हा गुन्हे शाखेत कार्यरत असून ते 1993मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर पोलिस खात्यात भरती झाले. आत्तापर्यंत त्यांची पोलीस खात्यात 31 वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. या कालावधीमध्ये त्यांना उत्कृष्ठ सेवेसाठी 470 बक्षिसे मिळाली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात काम करताना नागपुर येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी म्हणून जबाबदारी पार पडताना त्यांनी कुख्यात गुंडांना जेलमध्ये टाकून नागपूर शहर भयमुक्त करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांना पोलिस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. गुन्हेगारांविरुद्ध केलेल्या कारवाईसाठी आणि खळबळजनक तसेच गंभीर गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास केल्याबद्दल त्यांना “DG INSIGNIA” पदक जाहीर केले आहे. अभिजीत सावंत सध्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असून ते 2015 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर पोलीस खात्यामध्ये भरती झाले. आत्तापर्यंत त्यांची पोलीस खात्यात 9 वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. इतक्या कमी कालावधी मध्ये त्यांनी सांगली व पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे म्हणून त्यांना उत्कृष्ठ सेवेसाठी 150 बक्षिसे देखील मिळाली आहेत.
याबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय तांबे यांचा सन्मानचिन्ह प्रवर्ग ८ मध्ये जाहीर करण्यात आले आहे ते सध्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असून ते २00१ मध्ये पोलिस शिपाई पदावर पोलिस खात्यामध्ये भरती झाले. आत्तापर्यंत त्यांची पोलिस खात्यात २३ वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. या कालावधीमध्ये त्यांनी लोणीकाळभोर, राजगड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथे काम केले आहे. त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे म्हणून त्यांना उत्कृष्ठ सेवेसाठी २१ बक्षिसे देखील मिळाली आहेत.
याबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मंगेश संपत भगत यांची क्रीडा क्षेत्रात (कबड्डी खेळत) उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना “DG INSIGNIA” पदक जाहीर केले आहे. हे सन्मानचिन्ह प्रवर्ग 6 मध्ये जाहीर करण्यात आले आहे या प्रवर्गासाठी क्रीडा विभागातील अधिकारी व अंमलदार यांची निवड होत असते असे पोलीस खात्यातील जाणकाराचे मत आहे. ते 2012 मध्ये पोलीस खात्यामध्ये भरती झाले. आत्तापर्यंत त्यांची पोलीस खात्यात 13 वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. इतक्या कमी कालावधी मध्ये त्यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. मंगेश भगत सध्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असून त्यांनी गुन्हे प्रकटिकर यावर भर दिला आहे त्यांनी आत्ता पर्यंत 70 च्या आसपास अवैध शस्त्र पकडून कार्यवाही केली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी टोळक्यांच्या मुसक्या अवळण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून त्यांना उत्कृष्ठ सेवेसाठी 120 बक्षिसे देखील मिळाली आहेत.