लोणी काळभोर : थेऊर (ता.हवेली) येथील चिंतामणी विद्या मंदिराचे कार्यालयीन अधिकारी संजय अर्जुन कांचन यांची हवेली तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयाचे कार्यालयीन अधिकारी शंकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिराचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी दिली आहे.
पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघ व हवेली तालुका शिक्षकेतर सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयात आज शनिवारी (ता.२९) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये सन २०२२ ते २०२५ नव्याने त्रैवार्षिक कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली आहे.
दरम्यान, हवेली तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी संजय कांचन यांची तर उपाध्यक्षपदी शंकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुखदेव कंद, उपाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, विनोद गोरे, थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिराचे कार्यालयीन प्रमुख दत्तात्रय कोलते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन २०२२ ते २०२५ नव्याने त्रैवार्षिक कार्यकारिणी पुढीलप्रमाणे (कंसात पद आणि विद्यालयाचे नाव)
१) संजय कांचन, (अध्यक्ष, चिंतामणी विद्यामंदिर, थेऊर)
२) शंकर शिंदे (उपाध्यक्ष, संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय, शिंदवणे)
३) गुणवंत कोतवाल (कार्याध्यक्ष, न्यू इंग्लिश स्कूल, आष्टापूर)
४) स्वप्निल म्हस्के (कार्यवाह, पुरोगामी माध्यमिक विद्यालय, नायगाव)
५) महादेव तरकसे (सदस्य, म्हतोबा माध्यमिक विद्यालय, आळंदी म्हतोबा)
६) शंकर गोगावले (सदस्य,जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय, वाडे बोल्हाई)
७)शिवाजी गायकवाड (सदस्य, जनता विद्यालय, पिंपरी सांडस)
८) सुखदेव कंद (सदस्य, ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय, कुंजीरवाडी)