नवी दिल्ली : 2023-24 या आर्थिक वर्षात देशातील सूती धागे, कापड मेड अप आणि हातमाग उत्पादनांची निर्यात वार्षिक आधारावर 6.71 टक्क्यांनी वाढून 11.7 अब्ज डॉलर झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण निर्यातीत तीन टक्के घट झाली आहे.
‘मेड अप’ टेक्सटाईल उत्पादनांमध्ये चादरी, कार्पेट, पिलो कव्हर इत्यादीचा समावेश होतो. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये ही निर्यात 6.78 टक्क्यांनी वाढून एक अब्ज डॉलरवर गेली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात ही निर्यात 10.95 अब्ज डॉलर्सची होती. मंत्रालयाद्वारे देखरेख केलेल्या 30 प्रमुख उत्पादन श्रेणींपैकी ही एक आहे.
गेल्या आर्थिक वर्षात या क्षेत्रासाठी प्रमुख पाच निर्यात बाजारपेठांमध्ये अमेरिका, बांगलादेश, चीन, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) हे होते. त्यात आता सूती धागा-कापड निर्यातीत 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.