पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संशोधन सहकारी, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संशोधन सहकारी, मुंबई येथे ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो.
– एकूण रिक्त पदे : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा 37,000/- ते रु.42,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल आयडी : research.assistant@staff.ictmumbai.edu.in आणि pd.vaidya@ictmumbai.edu.in
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीचा पत्ता : रासायनिक अभियांत्रिकी विभाग, रासायनिक तंत्रज्ञान संस्था, माटुंगा, मुंबई-400019.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://www.ictmumbai.edu.in/ वरून माहिती घेता येणार आहे.