पुणे : पुणे शहरामध्ये सोमवार (दि. २९) ते मंगळवार (दि. ३०) या दोन दिवशी अति अति महत्त्वाचा यांचा दौरा असल्याने अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे जड/अवजड वाहने सर्व प्रकारचे ट्रेलर्स, कंटेनर्स, ट्रक्स, मिक्सर, डंपर, बल्कर व इतर मालवाहतूक करणारी वाहने यांना प्रवेश बंद करण्यात येत आहे, असे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.
सोलापूर रोड, सासवड रोड, बोपदेव घाट रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, पौड रोड, बाणेर रोड, औंध रोड, जुना पुणे-मुंबई महामार्ग, आळंदी रोड, लोहगाव रोड, थेऊर फाटा, मंतरवाडी फाटा, खडी मशिन चौक, कात्रज चौक, वडगाव पूल, चांदणी चौक, हॉटेल राधा चौक, राजीव गांधी पूल, हॅरिस स पूल-बोपखेल फाटा, नगर रोड, लोहगाव चौकम मार्गे वाहनचालकांनी सोमवारी (दि. २९) रोजी रु सकाळी ८ ते मंगळवारी (दि.३०) रोजी रात्रीम १२ वाजेपर्यंत पुणे शहरामध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.