पुणे : रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या पुण्यातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते दानापूर आणि पुणे ते गोरखपूर या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे-दानापूर-पुणे (ट्रेन क्र.०१०१३) २७ एप्रिल रोजी पुण्याहून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून, दानापूरला तिसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी पोहोचणार
आहे. तर, दानापूर ते पुणे (ट्रेन क्र. ०१०१४) २९ एप्रिल रोजी दानापूर येथून सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, पुण्याला दुसऱ्या दिवशी सायं. ५ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पण दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकावर थांबे दिले आहेत.
पुणे-गोरखपूर (ट्रेन क्र. ०१४११) २७ एप्रिल रोजी पुण्याहून सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, गोरखपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर, गोरखपूर-पुणे (ट्रेन क्र. ०१४१२) २८ एप्रिल रोजी=गोरखपूरहून सायं. ६ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून, पुण्याला तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीला हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती या स्थानकांवर थांबे दिले आहेत.