कामशेत : टोनी दा ढाबा नायगाव, पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्याला चाललेल्या कारचे चाक निघाल्याने शुक्रवारी (दि. २६) सकाळी ९:३० वा. भीषण अपघात झाला. तरुणी व ज्येष्ठ महिलाचा जखमी होवून मृत्यू झाला. ‘चालकासह चार महिला गंभीर जखमी झाल्या. अपघाताची फिर्याद ऋषिकेश तुकाराम लालगुडे यांनी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
सिद्धी संतोष तिकोणे (वय १८, रा.पाटण ता. मावळ) व सीताबाई तुकाराम लालगुडे (वय ६० रा. कुसगाव खुर्द ता. मावळ) असे अपघात मृत्यू झाल्याची नावे आहेत. चालक सुमित गुलाब पिंजण (रा. किन्हई मावळ), रिद्धी संतोष तिकोणे (वय १४ रा. पाटण), प्रियंका संग्राम भानुसघरे, सुभद्रा किसन भानुसघरे, लता किसन पिंजण अपघातातील गंभीर जखमींची नावे आहेत.
या अपघातात सिद्धी तिकोणे व सीताबाई लालगुडे या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.