त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील चक्रतीर्थ बेझे मित्रांसमवेत अंघोळीसाठी गेलेल्या नाशिक येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत त्रंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद खान मजीद खान पठाण (वय १६, रा. काठे गल्ली, द्वारका) हा गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत अंघोळीसाठी चक्रतीर्थ बेझे येथील नदीत गेला असताना तो पाण्यात बुडाला.
यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यास त्र्यंबकेश्वर येथीी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. विठ्ठल काळे यांनी त्यास तपासून त्यास मृत घोषित केले. दरम्यान, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी पंचनामा करुन याप्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळाणे करीत आहे.