लहू चव्हाण
पाचगणी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांची विशेष मुलाखत आजव उद्या प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर गुरुवार दि. 27 ऑक्टोबर व शुक्रवार दि. 28 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धा तसेच पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाचगणी नगपरिषदेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. नॅशनल टुरिझम अवॉर्ड या नगरपरिषदेला मिळाला आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छता, नियमित कचऱ्याचे संकलन, सुशोभीकरण यावर भर देवून आपल्या कामात सातत्य राखत तसेच पर्यटन क्षेत्राला गती देत पाचगणी नगरपरिषदेने हे यश मिळविले आहे. नगरपरिषदेच्या प्रेरणादायी कार्याची माहिती पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमात जाणून घेतली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.