नाशिक : कुटुंबियांना मारून टाकेन, अशी धमकी देत विवाहितेवर सातत्याने अत्याचार करण्यात आले. पीडित महिला ही ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होती. गेल्या दीड वर्षापासून ओळखीच्याच एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोद सुभाष बुध्दीसागर (वय 40) असे संशयित आरोपीचे नाव आहे. नांदूरनाका भागात राहणाऱ्या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयित एकाच भागातील रहिवासी असून, ते एकमेकांचे परिचयाचे आहेत. कौटुंबिक संबंधातून त्यांच्यात मैत्री झाली होती.
महिला घरात एकटी असल्याची संधी साधत त्याने बळजबरीने अत्याचार केले. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सदर प्रकार गेल्या दीड वर्षापासून सुरु होता.