उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२२-२३ अंतर्गत आमचा गाव आमचा विकास (GPDP) आराखडा सन २०२३- २४ ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे. याबाबत कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील आमचा गाव आमचा विकास या कार्यशाळेचे दोन दिवसीय आयोजन टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे करण्यात आले होते.
यामध्ये कोरेगाव मूळ गणातील कोरेगाव मूळ, टिळेकरवाडी, खामगावटेक, नायगाव, पेठ, भवरापूर, प्रयागधाम, शिंदेवाडी, हिंगणगाव, आदी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बागुल त्याचप्रमाणे यशदा मास्टर ट्रेनरचे काकडे सर, पंचायत समितीच्या सहप्रभारी पर्यवेक्षिका टेकवडे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, टिळेकरवाडीचे सरपंच सुभाष लोणकर, कोरेगाव मुळचे सरपंच विठ्ठल शितोळे, भवरापुरचे सरपंच सचिन सातव, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पर्यवेक्षिका टेकवडे यांनी गणातील ग्रामसंघ अध्यक्ष, सीआरपी, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, व गावपातळीवरील सर्व शासकीय कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश टिळेकर, गोवर्धन टिळेकर, सुशील राऊत, सुषमा टिळेकर, कल्पना टिळेकर, वैशाली चौरे, ग्रामसेविका बोराटे, पोलीस पाटील विजय टिळेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हवेली तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष सुभाष टिळेकर यांनी केले. तर आभार सुषमा टिळेकर यांनी मानले.