उरुळी कांचन : अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी नवनाथ कोतवाल यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पूर्वीचे सरपंच कविता जगताप यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. या पदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (ता.२१) पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया उरुळी कांचनच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत सरपंचपदासाठी अश्विनी कोतवाल यांचा एकमेव अर्ज आल्याने निर्णय अधिकारी सय्यद यांनी अश्विनी कोतवाल यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. तर या निवडणूक प्रक्रियेत तलाठी सुधीर जायभाय यांनी शासकीय कामकाज पहिले.
दरम्यान, अश्विनी कोतवाल यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होताच, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. तर यावेळी अष्टापूर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच अश्विनी कोतवाल यांचा सत्कार केला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, माजी सरपंच नितीन मेमाणे, उपसरपंच सुभाष कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, संजय कोतवाल, कालिदास कोतवाल, पुष्पा कोतवाल, अलका कोतवाल, कविता कोतवाल, रेश्मा ढवळे, सुभाष जगताप, सुखदेवांना कोतवाल, रमेश कोतवाल, शामराव कोतवाल, दत्तात्रेय कटके, विनायक कोतवाल, दत्तात्रेय कोतवाल व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अष्टापूर गावाच्या विकासाठी गट- तट बाजूला ठेवणार आहे. तसेच सर्व सदस्यांना एकत्र घेऊन गावातील विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित सरपंच अश्विनी कोतवाल यांनी सांगितले.