पुणे : कात्रज येथील सराफी दुकानाचा अलार्म वाजल्याने चोरट्यांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसल्याची घटना काल शनिवारी (ता.२२) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मात्र, चोरट्यांनी माघारी जाताना हवेत गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज भागातील दत्तनगर परिसरात ‘श्री मल्हार ज्वेलर्स’ नावाची सराफी पेढी आहे. सराफी पेढीचे मालक रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. शनिवारी (ता.२२) रात्री रात्री अकरा वाजता दुचाकीवरून दोघेजण दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीने आले होते. त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. चोरट्यांनी दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकानातील अलार्म वाजला. त्यामुळे नागरिक सतर्क झाले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर चोरट्यांनी पळ काढला. मात्र चोरट्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहेत. पोलीस चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.