पुणे : पेट्रोल चोरीचा आरोप केल्याचा राग मनात धरून एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २१) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविराज शिंदे , आदी आणि दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी फिरोज जमालउद्दीन शेख (वय २७, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज शेख यांनी आरोपी अविराज शिंदे याच्यावर पेट्रोल चोरीचा आरोप केला होता. शुक्रवारी (ता. २१) मध्यरात्री आपली दुचाकी सोसायटीच्या बाहेर पार्क करीत असताना, त्यावेळी तिथे आरोपी अविराज शिंदे आले आणि ‘मेरे पे झुटा इल्जाम लगाता है क्या, देख तेरे को अभी खत्म कर डालता हू’, असे म्हणत कोयत्याने यांच्या डोक्यात वार केला.
तसेच आरोपी अविराज शिंदे यांच्याबर आलेल्या तीन जणांनी मिळून फिरोज शेख यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिरोज शेख पळून जाण्याच्या पर्यंत करत असताना त्यांच्यावर दगड फेकून त्यांना जखमी केले. याप्रकरणी फिरोज शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.