पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तसेच पुण्यातील अभिनव विद्यालयातील आणि न्यू इंडिया स्कूल या शाळेमधील इंग्रजी माध्यम विभागाच्या माजी विभागप्रमुख मीना चंदावरकर (Meena Chandavarkar) (वय 85) यांचे काल बुधवारी वृद्धापकाळाने आणि अल्प आजाराने निधन झाले. विख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या त्या पत्नी होत.
शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर (Meena Chandavarkar) यांचे शालेय शिक्षण हे कोकणात झाले असून कॉलेजचे शिक्षण वाडिया कॉलेज पुणे येथे झाले. त्यांनी 1973 मध्ये अभिनव विद्यालय शाळेच्या इंग्रजी माध्यम विभागाची सुरुवात केली. त्यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक नवे प्रयोग केले.
राज्य सरकारच्या पहिलीपासून इंग्रजी या प्रकल्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. चंदावरकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पुण्यातील अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी तीस वर्षे काम केले. त्यानंतर न्यू इंडिया शाळेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले.