भोर : येथे श्री रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत गाडा अंगावरून गेल्याने गंभीर जखमी ‘झालेल्याचा आज (मंगळवार, दि. १६) मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि. १५) रोजी दुपारी घडली. विष्णू गेनबा भोमे (वय ६५, रा. शिंद, ता. भोर) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. भोमे हे शिंद येथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले होते. शर्यत पाहत असताना बैलगाडी अंगावर येऊन जोरदार धडक बसली. यात भोमे यांच्या डोक्याला व छातीला जोरदार मार लागला होता. त्यांना तात्काळ उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, येथील मागच्या काळामध्ये बैलगाडा शर्यत ही छंद म्हणून भरवल्या जात होत्या. मात्र सध्याच्या काळात बैलगाडा शर्यत व्यवसाय म्हणून केली जात असल्याच समोर येत आहे. तर बैलगाडा शर्यतीसाठी गावोगावातील तरुण वर्ग पूर्णता आहारी गेला असून बैलगाडा शर्यतीला कामधंदा सोडून तरुण जात असल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे जाणकार व्यक्तींकडून बोलले जात आहे.