पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे अप्रेंटिस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 861 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अप्रेंटिस.
– रिक्त पदे : 861 पदे.
– शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य (10 + 2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) 50% गुण.
– स्टायपेंड : 7,700/- ते 8,050/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीक : 09 मे 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://secr.indianrailways.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.