मुंबई : ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलाची जन्मदात्या आईने चाकूने भोसकून निघृणपणे हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मुलगा सतत रडत असल्याने निर्दयी बापाने जमिनीवर आपटून हत्या अवघ्या दीड वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून मानखुर्द पोलिसांनी आरोपी वडील इम्रान अनिस अन्सारी (३४) याला बेड्या ठोकल्या आहेत.
मानखुर्द, साठेनगर झोपडपट्टीमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. यातील मृत मुलगा आफान अन्सारी हा सतत रडत होता. याचा इम्रानला राग आला. त्याने सुरुवातीला मुलाला मारहाण केली. मात्र, तो आणखी रडू लागल्याने इम्रानने त्याला जमिनीवर आपटून ठार मारले. आफान हा निपचित पडल्याने आई सकिनाने तत्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले.