पुणे : कोरोना लसीकरणाला नागरिकांनी पाठ फिरवील्याने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाच्या तब्बल १० कोटी कोविशिल्ड लसी वाया गेल्या आहेत. अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी गुरुवारी (ता.२०) दिली आहे.
‘डेव्हलपिंग कन्ट्रीज व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स नेटवर्क’च्या (डीसीव्हीएमएन) पुण्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी पूनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आदर पूनावाला म्हणाले कि, सीरमने कोविशिल्ड लशीचे उत्पादन डिसेंबर २०२१ मध्येच थांबवले. लशीच्या त्या वेळच्या साठ्यापैकी शंभर दशलक्ष लशी मुदतबाह्य ठरल्या आहेत. तसेच लशीबाबत सार्वत्रिक उदासीनता असल्याने वर्धक मात्रेलाही मागणी नाही. लोकांना आणि मलाही आता करोना महासाथीचा कंटाळा आल्याचेही पूनावाला यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.