नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला आव्हान दिलेली याचिका फेटाळली. त्यांनी याचिकेद्वारे अटक आणि ईडी रिमांडला विरोध केला होता. यादरम्यान उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दणका दिला आणि म्हटले की, तपास यंत्रणेने गोळा केलेल्या पुराव्यावरून केजरीवाल यांनी इतर आरोपींसोबत मिळून संपूर्ण कट रचल्याचे दिसून येते.
न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या याचिकेवर निर्णय देताना सांगितले की, केजरीवाल या संपूर्ण कटात केवळ सहभागी नव्हते तर लाच घेणे आणि या गुन्ह्याशी संबंधित इतर गोष्टींमध्येही त्यांचा सहभाग होता. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक या नात्याने केजरीवाल स्वतः दारू धोरण बनवण्यात तसेच लाचेचे पैसे गोळा करण्यात गुंतले होते. या प्रकरणी जे जबाब नोंदवण्यात आले आहेत ते न्यायालयासमोर नोंदवण्यात आले. या वेळी उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की, न्यायालय हे राजकीय दबावाने नव्हे तर कायद्याने चालते.
आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्ष बुधवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती आहे.