पुणे : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिनव देशमुख यांचा कार्यकाल पूर्ण झाला नसला तरी बदली होणार अशी चर्चा मागील काय दिवसापासून सुरू होती. त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून अभिनव देशमुख यांची अखेर बदली झाली आहे. तर राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त रवींद्र सिंग परदेशी यांची चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.