राहुलकुमार अवचट
यवत : पुणे येथील ‘गिव्हिंग फॉर गुड’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने यवत परिसरातील यवत स्टेशन, खुटवड वस्ती व माणकोबावाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वॉटर बॉटल, कंपास बॉक्स, ड्रॉईंग बुक, वॉटर कलर, कलर पेन्सिल, पेन्सिल बॉक्स यांसह शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी यवत स्टेशन येथील ९३, खुटवडवस्ती येथील ४३ व माणकोबावाडी शाळेतील ७३ अशा एकूण २०९ विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ‘गिव्हिंग फॉर गुड फाउंडेशन’च्या हिनल शहा, साक्षी ग्रोव्हर, प्रियम शहा, सूरज निर्मळ, प्रतिक जोशी, यवत केंद्राचे केंद्रप्रमुख पी. पवार, यवत स्टेशनच्या मुख्याध्यापिका जयश्री रायकर, खुटवड वस्ती शाळेचे मुख्याध्यापक समद पठाण, माणकोबावाडी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती माने उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना हिनल शहा म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्थापक योगेश शहा यांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण, शालेय साहित्य व गणवेश पुरवण्याचे कार्य संस्था करत आहे. यापुढेही विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत संस्थेच्या माध्यमातून केली जाईल.
या वेळी शिक्षक गणेश खेडेकर, रामहरी लावंड, अनिल हुंबे, संगीता टिळेकर, संगीता वाळके, अनुराधा परदेशी, विक्रम लांडगे, संदीप साळवे, सूर्यकांत चंदनशिवे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर खताळ, ग्रामपंचायत सदस्य नंदा बिचकुले, मनोहर खुटवड, निवृत्त पोलीस अधिकारी बबन गायकवाड, सूरज चोरघे यांसह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.