दिनेश सोनवणे
दौंड : घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील तब्बल ११ लाखाचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना दौंड (जि. पुणे) हद्दीतील एरीगेशन कॉलनीजवळ शुक्रवारी (ता.१४) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी प्रिया महेश रणसिंग (वय-३०, रा- एरीगेशन कॉलनी, पिरँमीड हाँस्पीटलशेजारी सहकार चौक ता दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया रणसिंग ह्या एक गृहिणी आहेत. त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजुस असलेल्या बाथरुमच्या खिडकीची जाऴी उचकटुन, अज्ञात चोरट्याने रणसिंग यांच्या घरात शुक्रवारी (ता.१४) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. आणि घरातील दिवाणमधील १० लाख ७२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तु चोरून नेल्या आहेत.
दरम्यान, याप्रकरणी प्रिया रणसिंग यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चवरे मँडम करीत आहेत.