पुणे: मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याची घाक्कादायक घटना कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 7 मध्ये उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दत्तात्रय कुरळे असे मृतदेह आढळून आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कुरळे हे शिपाई म्हणून पोलिस दलात भरती झाले होते. त्यानंतर पदोन्नतीने ते पोलिस उपनिरीक्षक झाले होते.
दरम्यान, पुणे शहर नियंत्रण कक्षाला शनिवारी (ता.१६) सकाळी साडेदहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे.