Tejas Aircraft Crash : राजस्थानमधील जैसलमेर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय लष्कराचं तेजस लढाऊ विमान एका हॉस्टेलवर कोसळल आहे. ही दुर्घटना मंगळवारी प्रशिक्षणादरम्यान घडली असून सुदैवाने या दुर्घटनेतून पायलट बचावला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जवाहर नगर, जैसलमेर येथे ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत हॅलिकॉप्टर आगीच्या विळख्यात थेट मेघवाल मसाजाच्या हॉस्टेलवर कोसळलं आहे. हॅलिकॉप्टर पडल्याचं समजताच येथील विद्यार्थी आणि परिसरातील अन्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमनदलाची वाहने देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. सध्या अग्निशमनदलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
#WATCH | Rajasthan | A Light Combat Aircraft (LCA) Tejas of the Indian Air Force crashed near Jaisalmer today during an operational training sortie. The pilot ejected safely. A Court of Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident. pic.twitter.com/3JZf15Q8eZ
— ANI (@ANI) March 12, 2024