उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या जमिनीचा लिलावापुर्वीच पुणे बाजार समिती व शेजारील मिळकतदार यांच्याच वाद सुरु झाला आहे. शेजारील मिळकतदार नितीन भोसले यांनी मिळकतीवरील सुरू असलेल्या हद्द निश्चिती व तारेचा कुंपन कामाला हरकत घेतली होती. त्यामुळे हे काम तातडीने थांबविण्याचा प्रक्रियेचा विवाद पोलिसांच्यापर्यंत पोहचला होता. मात्र प्रलंबित वाद कायम राहिल्याने या मिळकतीच्या ताब्यावरुन आज शनिवारी (ता.१५) दिवसभर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची जमीन पुणे कृषी उत्पन्न समितीने महाराष्ट्र प्रोटेशन इंप्रिमेट ऑफ डिपॉसीटर ऍक्ट नुसार ताबा घेतला आहे. आणि सदर मिळकत खुल्या लिलाव पद्धतीने विक्रीस काढली आहे. परंतु, बँकेच्या अध्यक्ष अनिल भोसले यांनी खरेदी केलेल्या मिळकतीवरील पश्चिम (कोरेगावमूळ हमरस्ता)व दक्षिण बाजू (अलंकार कार्यालय) या २०१/२ गटातील मिळकत क्षेत्रावरुन बाजार समिती व शेजारील मिळकतदार नितीन शिवाजीराव भोसले यांच्यात हद्द निश्चिती व वहिवाटीवरुन मतभेद निर्माण झाले आहेत.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने शिवाजीराव भोसले बँकेच्या प्रशासकाकाकडून बँकेचे अध्यक्ष अनिल भोसले यांच्या मालकीच्या ०४ हेक्टर ८०.७१ आर या मिळकतीचा लिलाव खुल्या बोली पद्धतीने घेतला आहे. बॅकेने केलेल्या लिलाव क्षेत्राची बाजार समितीने जिल्हाधिकारी, पुणे,हवेली तहसिलदार, मंडल अधिकारी उरुळी कांचन यांच्या ताबा पंचनामा अहवालाने गट क्र.२०१/२, ३३०/अ (२), ३२८ गट या मिळकतीचे ७ ऑक्टोबर २०२२ रोजी खरेदी केले आहे.
त्यानंतर खरेदीखतानुसार गट क्र.२०१/२ पश्चिम व दक्षिण बाजूकडील मिळकत बाजार समितीची असल्याचा दावा बाजार समितीच्या अधिकाऱ्यांचा आहे. तर नितीन भोसले यांचा २०१/२ गटातील मिळकत वाटणी पत्रातील दस्तावेजाच्या आधारे स्वतःची मिळकत असल्याचा दावा केला आहे. तर नितीन भोसले यांनी जमीन मोजणी क प्रतीच्या आधारे या मिळकतीवर बोर्ड व कुंपण तारेचे काम सुरू केले आहे. या मिळकतीवरुन विवाद होऊन बाजार समितीने पोलिस ठाणे गाठले आहे. यावरुनच दिवसभर या ठिकाणी विवाद सुरू असल्याने गोंधळाची स्थिती आहे.
पोलिस प्रशासनाने तारेचे कुंपनाचे काम थांबवित नसल्याचा आक्षेप पुणे बाजार समितीचे अधिकारी नोंदवित आहे. तर पूर्ण शासकीय मोजणी होईपर्यंत काम थांबवावे. असा आग्रह बाजार समितीकडून सुरू होता. कोरेगाव मूळ रस्त्यालगतच्या गटातील २०१/२ गटावरील अंदाजे २०० फूट मिळकतीवरील वाद सुरू आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही बाजूकडील वाद विवादाला मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवसभर या मिळकतीवरून बाजार समिती व नितीन भोसले हे ठिय्या मांडून बसल्याने पोलिसांना विवाद मिटविण्यात मोठी कसरत करावी लागली. दरम्यान पुणे बाजार समितीने ५३ कोटी १८ लाख रुपये खुल्या लिलाव पध्दतीने ०४ हेक्टर ८०.७१ आर क्षेत्र खरेदी केले आहे.