पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरिया यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
पीएमपीचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय सहाय्य म्हणून नेमणूक दिल्ली येथे करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त होते. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने मिश्रा यांच्या जागेवर बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचे राज्य शासनाने आदेश काढले आहेत.
ओमप्रकाश बकोरिया यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार सांभळला होता. त्यानंतर त्यांनी क्रीडा आयुक्त म्हणून कामकाज पहिले आहे. महापालिकेत कार्यरत असताना वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. त्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाने ओमप्रकाश बकोरिया यांच्यावर पीएमपी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी दिली आहे. आणि मिश्रा यांच्या जागेवर बकोरिया हे लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.