लोणी काळभोर, ता. ११ : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी”ने २१ पैकी १८ जागा जिंकून इतिहास रचला आहे. तर हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे व महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल”ला केवळ ३ जागा मिळाल्याने खूप मोठा धक्का बसला आहे
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात रविवारी (ता. १०) सकाळी सुरु झाली. हि मतमोजणी मध्यरात्री पर्यंत सुरु होती. त्यामुळे काही निकाल मध्यरात्री १ ते दीड वाजण्याच्या सुमारास लागले. या निवडणुकीत “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी”ने २१ पैकी १८ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. तर या निवडणुकीत रयत सहकार पॅनलला केवळ ३ जागा मिळाल्याने मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान, “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल” व “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” या दोन्ही पॅनल प्रमुख आपणच विजयी होणार असा दावा करीत होते. मात्र या निवडणुकीच्या निकालावरून शेतकरी सभासदांनी आपला कौल “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी”ला दिल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तर या निवडणुकीच्या निर्णय अधिकारी म्हणून डॉ. शीतल पाटील यांनी काम पहिले.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे (गट, उमेदवाराचे नाव, कंसात मते)
उरुळी कांचन-शिंदवणे गट क्र १- मधील विजयी उमेदवार : संतोष आबासाहेब कांचन (५६३९) सुनिल सुभाष कांचन (५४२२), सुशांत सुनिल दरेकर (५१५१, तीनही शेतकरी विकास आघाडी), पराभूत उमेदवार : विकास विलास आतकीरे ( ४८५२), अजिंक्य महादेव कांचन ( ४५११), अमित भाऊसाहेब कांचन ( ४१९९, तीनही रयत सहकार पॅनेल ),सदानंद यशवंत बालगुडे (अपक्ष – ३५४)
सोरतापवाडी-कोरेगावमूळ-नायगाव गट क्र २ मधील विजयी उमेदवार : शशिकांत मुरलीधर चौधरी (५२०१), विजय किसन चौधरी (५३०५), ताराचंद साहेबराव कोलते (५१९०), पराभूत झालेले उमेदवार : राजेंद्र रतन चौधरी (४७२८) , मारुती सिताराम चौधरी (४३३७) , लोकेश विलास कानकाटे (४४९९, तीनही रयत सहकार पॅनेल),धनंजय नानासाहेब चौधरी (अपक्ष -१६९), राजेश लक्ष्मण चौधरी (अपक्ष – १५३)
थेऊर – लोणी काळभोर गट क्र ३ मधील विजयी उमेदवार : नवनाथ तुकाराम काकडे (५१६१,रयत सहकार पॅनल) , योगेश प्रल्हाद काळभोर (४९५६), मोरेश्वर पांडुरंग काळे (५२५२, दोघेही शेतकरी विकास आघाडी), पराभूत झालेले उमेदवार : आप्पासाहेब रंगनाथ काळभोर (४७८२ ), राहुल मधुकर काळभोर (४२२०, दोघेही रयत सहकार पॅनल), अमर उद्धवराव काळभोर (४८८२, शेतकरी विकास आघाडी), हिरामण नारायण काकडे (अपक्ष -गॅस सिलेंडर -३०२)
मांजरी बु – फुरसुंगी गट क्र ४ मधील विजयी उमेदवार : अमोल प्रल्हाद हरपळे (५४०८), राहुल सुभाष घुले (५४८२, दोघेही शेतकरी विकास आघाडी), पराभूत झालेले उमेदवार : राजीव शिवाजीराव घुले (४९४४), सुरेश फकीरराव कामठे (४६५५, रयत सहकार पॅनल)
कोलवडी -मांजरी खुर्द गट क्र ५ मधील विजयी उमेदवार : किशोर शंकर उंद्रे (५२१७), रामदास सिताराम गायकवाड (५२२३, दोघेही शेतकरी विकास आघाडी), पराभूत झालेले उमेदवार : रोहिदास दामोदर उंद्रे (५१२५), आनंदा देवराम पवार (४१४३, दोघेही रयत सहकार पॅनल), अमोल भिकोबा गायकवाड (अपक्ष -विमान – ११६), भाऊसाहेब ज्ञानोबा गायकवाड (अपक्ष -टेबल – ३९), राजाराम पंढरीनाथ गायकवाड ( बॅटरी टॉर्च – ४८)
अष्टापूर गट क्र ६ मधून विजयी उमेदवार : शामराव सोपाना कोतवाल(४८९८, रयत सहकार पॅनल)
सुभाष चंद्रकांत जगताप (५४६६, शेतकरी विकास आघाडी), पराभूत झालेले उमेदवार : दीपक कुशाबा गावडे (४६९२, रयत सहकार पॅनल) रमेश जगन्नाथ गोते, (४७११,शेतकरी विकास आघाडी), अनिल रामचंद्र चौंधे (अपक्ष ८०)
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी गट -ब मधून विजयी उमेदवार : सागर अशोक काळभोर (२०२, रयत सहकार पॅनल ), पराभूत झालेले उमेदवार : संजय सोपानराव गायकवाड (३३,शेतकरी विकास आघाडी)
महिला राखीव प्रतिनिधी मधून विजयी झालेले उमेदवार : हेमा मिलींद काळभोर (५४४५), रत्नाबाई माणिक काळभोर (५६४१, दोघेही शेतकरी विकास आघाडी) , पराभूत झालेले उमेदवार : सुरेखा मधुकर घुले (४४०६ ) संगीता सखाराम काळभोर (४७६४, रयत सहकार पॅनल)
अनुसूचित जाती/जमाती मधून विजयी झालेले उमेदवार : दिलीप नाना शिंदे (५६९५, शेतकरी विकास आघाडी), पराभूत झालेले उमेदवार : संतोष दत्तात्रय वेताळ (४८७७,रयत सहकार पॅनल), अंकुश अमृता कांबळे (अपक्ष -१३२)
इतर मागास वर्गीय प्रतिनिधी मधून विजयी उमेदवार : मोहन खंडेराव म्हेत्रे (४६१८, शेतकरी विकास आघाडी), पराभूत झालेले उमेदवार : रोहिदास गोविंद टिळेकर (४१५९,रयत सहकार पॅनल) , भाऊसाहेब ज्ञानोबा गायकवाड (अपक्ष-५२), मानसिंग बाळासाहेब गावडे (अपक्ष -५६) संतोष पोपट हरगुडे (अपक्ष-१५४३)
भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी मधून विजयी उमेदवार : कुंडलिक अर्जून थोरात (६०७५, शेतकरी विकास आघाडी ), पराभूत झालेले उमेदवार : मारुती किसन थोरात (४६७३,रयत सहकार पॅनल)