पुणे : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत नागरिकांनी मोठ्या उत्साहात शुक्रवारी (ता.१४) केले.
संत सोपानदेव महाराज सासवड यांचा पंचक्रोशी प्रदक्षिणा पायी पालखी सोहळा सातव्या दिवशीचा हवेली तालुक्यातील वडकीगाव येथील एकमेव मुक्काम आटोपून ह.भ.प.माउली महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार (ता. १४ ) रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर पानमळा आळंदी म्हातोबाची (ता. हवेली, जि. पुणे) येथे आगमन झाले होते.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.माउली महाराज कदम , सुधाकर गिरमे , दिलीपदादा गायकवाड , शंकर देवकर , विणेकरी शिंदेमामा , नारायण महाराज खंदारे व सर्व गायक , वादक , टाळकरी यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही गावामध्ये श्री संत सोपानदेव महाराज , सासवड यांचा पंचक्रोशी प्रदक्षिणा पायी पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी येतो. पालखी सोहळा गावामध्ये दाखल होताच सर्व ग्रामस्थांनी फटाके वाजून आलेल्या वारकऱ्यांची पाद्यपूजा व पुष्पवृष्टी करून स्वागत केले. पालखी सोहळ्याची गावामधून महिलांनी सुंदर रांगोळ्या काढून दिंडी काढण्यात आली.
दरम्यान, या सोहळ्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, त्यामुळे महिलांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी सर्व महिलांनी एकत्र येऊन आलेल्या वारकऱ्यांच्या जेवणासाठी पिठले भाकरी चा स्वयंपाक बनविला तसेच दुपारच्या विसाव्यासाठी पालखी सोहळा मंदिरामध्ये आल्यानंतर श्री संत सोपानदेव महाराजांच्या पादुकांचा अभिषेक आळंदी म्हातोबा गावाचे ग्रामविकास अधिकारी पी.एस.पवार यांच्या शुभहस्ते, महापूजा प्रगतशील शेतकरी गणेश शिवरकर व सविता शिवरकर या दाम्पत्यांच्या शुभहस्ते करण्यात आली .
यामध्ये प्रामुख्याने पानमळा तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुक्याचे अध्यक्ष संदिप शिवरकर , महेश शिवरकर , सतिश शिवरकर , पवन काळे , पोपट जवळकर , सनी शिवरकर , ग्रामपंचायत सदस्या उज्वला शिवरकर , सिमा जवळकर , अक्षदा जवळकर , राणी जवळकर , सारिका शिवरकर , रोहिणी शिवरकर , सिमा शिवरकर , सोसायटी संचालक बाळासाहेब जवळकर , बाळासाहेब शिवरकर , मा.सरपंच आबासो जवळकर , मा.उपसरपंच तेजस शिवरकर , चंद्रकांत शिवरकर , मनोहर शिवरकर व पानमळा भजनी मंडळ उपस्थित होते. श्री संत सोपानदेव पालखी सोहळ्याच्या वतीने ग्रामस्थांचे श्रीफळ देऊन व खासकरून महिलांचे आभार मानून पालखी सोहळा दौंड तालुक्यातील डाळिंबगाव येथील मुक्कामासाठी दुपारी 3 वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला.