पुणे : स्वतःचा मुलगा ‘गे’ असल्याचे लपवून आई-वडिलांनी त्याचा विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, लग्न झाल्यानंतर त्याचे भांड फोड झाल आहे. या प्रकारानातर नवविवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेत थेट तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी २८ वर्षीय पतीसह सासू-सासरे यांच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ३४ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी या पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहतात. जुलै २०२२ रोजी त्यांचे २८ वर्षीय तरुणासोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर पती समलैंगिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी सासू-सासरे यांच्याकडे विचारणा केली असता फिर्यादीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली
. कार घेऊन येण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी फिर्यादीवर दबाव टाकण्यात आला. यानंतर मात्र फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. स्वतःचा मुलगा ‘गे’ असल्याचे माहित असून सुद्धा लपवून ठेवत लग्न लावून दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.