व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तारीख आली! ‘या’ दिवशी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 6 March 2024, 23:08
ex MLA vasant Chavan name referred to state committee for nanded loksabha

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेस उमेदवारांच्या नावांची पहिली यादी निश्चित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत, ज्यात माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाही समावेश आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक 7 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. 

जाहीरनाम्याचा मसुदा तयार

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या काँग्रेस पॅनलनेही मसुदा तयार केला आहे. आता काँग्रेस कार्यकारिणी यावर चर्चा करणार आहे. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम म्हणाले की, ते काँग्रेस अध्यक्षांसमोर मसुदा सादर करणार आहेत. 

त्यांनी सांगितले की, आम्ही जाहीरनाम्याचा मसुदा तयार केला आहे. आता तो काँग्रेस कार्यकारिणीसमोर मांडला जाणार आहे. समितीच्या बैठकीत याला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर हा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बनेल. उद्या ते काँग्रेस अध्यक्षांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रियंका रायबरेलीतून निवडणूक लढवू शकतात

यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, यावेळी प्रियांका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात. ही जागा काँग्रेसची पारंपरिक जागा आहे. सध्या सोनिया गांधी येथून लोकसभेच्या खासदार आहेत. मात्र यावेळी सोनिया राजस्थानमधून राज्यसभेत पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रियांका गांधी या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवू शकतात. 

भाजपने 195 उमेदवारांची केली नावे जाहीर 

एप्रिल-मे महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यापूर्वी 2 मार्च रोजी भाजपने 195 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. भाजपच्या पहिल्या यादीत 34 खासदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. तर 34 केंद्रीय मंत्री आणि 3 माजी मुख्यमंत्र्यांना या यादीत उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 24 महिलांचीही नावे आहेत. पीएम मोदी वाराणसीतून, अमित शहा गांधीनगरमधून, राजनाथ सिंह लखनऊमधून आणि स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवत आहेत.   

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं : तब्बल एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद

Thursday, 22 May 2025, 22:47

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड ; विधानपरिषदेच्या सभापतींची कारवाई

Thursday, 22 May 2025, 21:39

घरगुती कारणावरून भाच्याची मामाला मारहाण, उपचारादरम्यान मामाचा मृत्यू

Thursday, 22 May 2025, 21:28

महिला मंडल अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ,तलाठी संघटनेकडून भानुदास खामकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ; शिरूर तालुक्यातील प्रकार

Thursday, 22 May 2025, 21:13

खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश ; ‘तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील उन्नत मार्ग व सहापदरीकरणास राज्य शासनाची मंजुरी

Thursday, 22 May 2025, 20:57

राजेगाव येथील राजेश्वर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. विठ्ठल मोघे यांची तर उपाध्यक्षपदी शरद मेंगावडे बिनविरोध

Thursday, 22 May 2025, 20:21
Next Post
two more vande bharat express will on central railway mumbai kolhapur and pune to vadodara

मुंबई-कोल्हापूर, पुणे-वडोदरा वंदे भारत धावणार

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.