नांदेड : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यावर जनता नाराज आहे. भाजप विरोधात लढण्याची गरज आहे. त्यामुळे मी कॉंग्रेसचे नेते नाना पाटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. जर पक्षाने आदेश दिला तर निश्चितपणे लोकसभा निवडणूक लढवणार आहे. आज घडीला अशोकराव चव्हाण यांच्यावर जनता नाराज आहे. काँग्रेसचे दहा टक्के मतदान वाढले आहे, असा दावा यशपाल भिंगे यांनी केला.