लोणी काळभोर : हवेली भुमी अभिलेख कार्यालयाची दप्तर तपासणी करण्यात यावी. व दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. अशी मागणी माहिती सेवा सामितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे राज्यपालांकडे केली आहे.
हवेली भुमी अभिलेख कार्यालयात खुप मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामे होत असतात, पैसे दिले कि काम होते, गरीबांना मात्र हेलपाटे मारावे लागतात. अशा प्रकारे अनेक तक्रारी माहिती सेवा समितीचे कार्यालयात आल्या होत्या. तसेच याचा अनुभव स्वतः मला आला आहे. माझ्या घराकडे जाणारा रस्ता तेथील काही नागरिकांनी बेकायदेशीर पणे खोदून बंद केला होता.
याबाबत हवेली तहसिलदार यांचे कडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी भुमी अभिलेख हवेली, लोणिकंद पोलिस, मंडल अधिकारी यांना नोटीस काढून रस्ता चालू करणेबाबत सुचना करण्यात आल्या होत्या. सर्व विभागाचे अधिकारी आले, परंतु भुमी अभिलेख कार्यालयातील एकही अधिकारी आला नाही. त्यामुळे ते काम पुर्ण होऊ शकले नाही.
हवेली भुमी अभिलेख कार्यालयात अनेक जन बेकायदेशीर रीत्या सरकारी कर्मचारी नसताना त्याठिकाणी काम करत आहेत. सरकारी कागदपत्रे हाताळत आहेत. त्यांचेवर ही कारवाई झाली पाहिजे, त्यामुळे माहिती सेवा समितीचे माध्यमातून उपाधिक्षक गौरकर, तत्कालीन उपाधिक्षक गौडकर मॅडम यांनी केलेल्या कामाची चौकशी समिती नेमुन दप्तर तपासणी करावी व कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.
दरम्यान, चंद्रकांत वारघडे यांनी याप्रकरणी राज्यपाल , मुख्य सचिव, मुख्य न्यायाधीश, महसुल सचीव, विभागीय आयुक्त, जिल्हाअधिक्षक भुमी अभिलेख, जमावबंदी आयुक्त,एसीबी मुंबई, पोलिस निरीक्षक बंडगार्डन पोलिस तहेने यांचेकडे लेखी तक्रार केली आहे. आणि हवेली भुमी अभिलेख कार्यालयाची दप्तर तपासणी करून कारवाई करा. तसेच १५ दिवसात चौकशी समिती नेमली नाही तर जमाव बंदी आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.