पिंपरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख विजय थोरी यांच्या मुलाची हत्या झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे. विशाल विजय थोरी असं या 23 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय देहूरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
विकासनगर किवळे भागात असलेल्या श्री साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळच अज्ञात लोकांनी विशालची दगडाने ठेचून निर्घुण हत्या केली आहे. विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांना गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे. विकास नगर येथे रात्री १ वाजेच्या सुमारास विशाल थोरी याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्यांने हल्ला केला. विशालला काही कळण्याच्या आतच त्याच्यावर दगड लाठ्याकाठ्यांनी हल्ला केली. त्याच्या डोक्यामध्ये आणि तोंडावर कुंडी मारली. सिमेंटचा गट्टू व लाकडी बांबूने मारहाण करून त्याला ठार केलं. सर्व आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.