Thursday, June 12, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ओल्या चाऱ्याची टंचाई, कडबा महागला, पशुखाद्याची भाववाढ… पशुधन जगवायचे कसे? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 March 2024, 14:26

युनूस तांबोळी

शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात पशुधन जगविताना पशुपालक व शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ओला चारा कमी झाला आहे. धरणांमधून पाणी सुटले आहे; परंतु ते पिकांपर्यंत पोहोचण्यास अवकाश आहे. तोपर्यंत चारा टिकवणे मुश्किल झाले आहे. परिणामी चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दुधाचे उतरलेले भाव, पशुखाद्याची भाववाढ, ओला-सुका चारा मिळण्यास अडचण यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीच्या कडब्याला उन्हाळ्यात जास्त मागणी असते. ऊस कारखानदारी सुरू असेपर्यंत जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाच्या वाढ्याचा उपयोग शेतकरी करतात. ऊसाच्या वाढ्याला शेकडा २५० रुपये दर आहे. हा दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, पशुधन वाचविण्यासाठी पशुपालक तडजोड करताना दिसत आहेत. दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्याने दुग्ध व्यवसाय संकटात आला आहे.

सध्या ऊसाचा हंगाम संपत आला असून, ऊस जळीताचे प्रकार वाढत आहेत. अनेक कारणांमुळे‌ उसाच्या वाढ्याचे प्रमाण कमी झाले आहे. जनावरांसाठी चारा पीक म्हणून उपयोगी पडणारे हत्ती गवत, नेपेरीआ, मुरघास, घास यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कडब्याला मागणी वाढली आहे. पठार भागातील अनेक कडबा व्यावसायिक तसेच शेतकरी आपल्याजवळील ‌कडबा या भागात आणताना दिसत आहेत. सध्या कडब्याला शेकडा २५०० ते ३५०० रुपये भाव मिळत आहे.

दुग्ध उत्पादनात मोठी उलाढाल होत असते. डेअरी उद्योगांमुळे दूध पूरक उद्योग वाढीस लागले आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने ज्वारीचे उत्पादन कमी झाले. कडब्याच्या कमतरतेमुळे त्यांचे भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे शेतकरी पांडुरंग भोर यांनी सांगितले.

शासनाने दूध व्यावसायिकांना मदतीचा हात द्यावा

दुधाचे दर वाढले की ग्राहकाकडून तक्रार केली जाते. मात्र, पशुखाद्याचे दरही दुधाच्या दरवाढीपेक्षा अधिक पटीने वाढले आहेत. ओला आणि सुका चारा महागला आहे. त्यामुळे लिटर मागे दूध उत्पादन खर्च वाढला आहे. शासनाने दूध व्यवसायिकांना मदतीचा हात दिला पाहिजे.

– राजेश सांडभोर, दुग्ध व्यावसायिक

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

साबळेवाडी येथे शासकीय मालमत्तेचे नुकसान; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल…..

Thursday, 12 June 2025, 12:24

पावसाळ्यात पुणेकरांची कचरा कोंडी; शहरातील महत्वाचे प्रकल्प बंद, नियोजनाअभावी नागरिकांचा संताप

Thursday, 12 June 2025, 10:55

भिगवणला लवकरच मिळणार नवे बसस्थानक? मंत्र्याच्या दौऱ्यानंतर कामाला गती

Thursday, 12 June 2025, 10:28

८२ वर्षीय प्राध्यापकाला वृद्धाश्रमात पाठवून घरकाम करणाऱ्या महिलेने तब्बल ६ कोटी रुपयांचे फ्लॅट्स हडपले, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Thursday, 12 June 2025, 10:08

पुणेकरांनो लक्ष द्या! आज दिवसभर पाणीपुरवठा बंद, ‘या’ भागांना बसणार फटका

Thursday, 12 June 2025, 9:19

चारित्र्याच्या संशयावरून झोपलेल्या पत्नीवर चाकूने 15 वेळा केले सपासप वार, दोन चिमुकल्यांसमोर आईची निर्घृण हत्या

Thursday, 12 June 2025, 8:30
Next Post

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक; राज्यपालांना मेल पाठवत केली आमदारांची तक्रार

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.